दाभोळ : आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aambet Bridge

कोकणातून मुंबई पूणे आदी ठिकाणी जाण्यासाठी व मुंबई गोवा महामार्गावर जाण्यासाठी जवळचा असलेला आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद.

दाभोळ : आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद

दाभोळ - कोकणातून मुंबई पूणे आदी ठिकाणी जाण्यासाठी व मुंबई गोवा महामार्गावर जाण्यासाठी जवळचा असलेला दापोली मंडणगड या दोन तालुक्यातील जनतेसाठी महत्वाचा असलेला आंबेत पूल सध्या पुन्हा दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी व अन्य कामासाठी केलेल्या खर्चाची चौकशी  दिल्ली येथील 'कॅग' द्वारे करण्यात यावी अशी मागणी दापोली तालुक्यातील मुर्डी येथील ग्रामस्थ विनय जोशी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

भारताचे नियंत्रक व  महालेखापरीक्षक म्हणजेच ‘कंप्ट्रोलर अ‍ॅण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ (कॅग’) या संस्थेकडे ही मागणी जोशी यांनी इमेलद्वारे केली आहे.    

२०२०-२१ मध्ये आंबेत पूल दुरुस्तीसाठी बंद करून त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये करदात्यांच्या पैशातून खर्च करण्यात आले, शिवाय प्रवाशांना पैसे देऊन, वेळ मोडून फेरीबोटीतून जायला लागले तोच प्रकार आताही सुरू असुन पुन्हा हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे.

हा पूल जून २०२१ ला चालू करून तो परत बंद करण्यात आला आणि वाहन चालकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी त्यांना आता फेरीबोटीतून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून शासनाकडून सुवर्णदुर्ग कंपनीला त्यासाठी पैसे दिले जात आहेत.

या संबंधात गेल्यावर्षी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करणारी कंपनी, पुलाची दुरुस्ती करणारी कंपनी, पूल परत बंद करण्याची शिफारस करणारी कंपनी आणि आता परत दुरुस्ती करणारी कंपनी आणि याबद्दल सरकारने आजपर्यंत केलेला खर्च, शिवाय फेरीबोटी कंपनीला मोफत सेवेसाठी दिला जाणारा पैसा या खर्चाचे कॅग द्वारे ऑडीट करण्याची मागणी विनय जोशी यांनी कॅग कडे इमेल द्वारे केली आहे.

पूल बंद असल्याने दापोली, मंडणगडच्या प्रवाशांना वळसा मारून महाड मार्गे किंवा किमती वेळ म्हाप्रळ व आंबेत येथे जेटीवर वाट बघत घालवावा लागतो. त्यामुळे आंबेत पूल नेमका कुणाच्या फायद्यासाठी परत बंद करण्यात आला? आधी केलेल्या दुरुस्तीच्या वेळीच पूर्ण काम का करण्यात आलं नाही? परत परत दुरुस्तीचे काम काढण्यात नक्की कुणाचा फायदा केला जातोय? सामान्य जनतेला गैरसोय निर्माण त्याचा फायदा कोण घेतोय याची चौकशी कॅगद्वारे करण्याची मागणी आपण केली आहे अशी माहिती विनय जोशी यांनी दिली.

Web Title: Dabhol Aambet Bridge Close For Repairing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bridgedabhol
go to top