Dapoli Villagers Protest : दाभोळ अणुऊर्जा प्रकल्पाला पहिला सामूहिक विरोध वणौशी-दुमदेव ग्रामस्थांचा जनआक्रोश; काळेश्वरी देवीसमोर साकडे घालत ‘प्रकल्प नकोच’चा एकमुखी निर्धार

First Collective Opposition to Dabhol Nuclear Power Project : दापोली तालुक्यातील प्रस्तावित २८०० मेगावॅट दाभोळ अणुऊर्जा प्रकल्पाला वणौशी-दुमदेव परिसरातील ग्रामस्थांनी सामूहिक विरोध दर्शविला.
Dapoli Villagers Protest

Dapoli Villagers Protest

esakal

Updated on

दापोली : दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी गावाच्या भिवबंदर तसेच आघारी महसुली गावाच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या २८०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून पहिला सामूहिक विरोधाचा सूर उमटला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाल्यानंतर वणौशी तर्फे पंचनदी येथील ग्रामदैवत श्री काळेश्वरी मंदिरात स्थानिक तसेच मुंबईवासीय ग्रामस्थांची सभा झाली. या सभेत ‘निसर्गसंपन्न भूमीत अणुऊर्जा प्रकल्प नकोच,’ असा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी देवीसमोर गाऱ्हाणे घालत, ‘हा प्रकल्प वरच्यावरच जिरू दे,’ अशी प्रार्थना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com