शेतकरी झाला हताश ; ते कळपाने येऊन माजऊ लागले दहशत

Damage to agriculture by Gavareda herd in Bhirwande area
Damage to agriculture by Gavareda herd in Bhirwande area
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) : भिरवंडे येथील सह्याद्री पट्ट्यातील भिरवंडे खलांतर वरचीवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या पेरणी झालेल्या शेतात गवारेड्यांच्या कळपाने हैदोस घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जंगल भागातून गवारेड्यांचा कळप वस्ती मध्ये येऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे .

खलांतर वरचीवाडी येथील विलास उर्फ बाबू सावंत यांच्या पेरणी केलेल्या भात शेतांमध्ये शनिवारी रात्री गवारेड्याच्या कळपाने प्रवेश केला. पेरणी केलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे याबाबत वनविभागाकडून पंचनामा ही करण्यात आला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणी झाली होती त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत भात रोपे वाढली.  या रोपांमध्ये गावारेड्यांच्या कळपाने प्रवेश केल्याने लावणी पूर्वीच शेतकऱ्यांच्या भात रोपांचे नुकसान होऊ लागली आहे.

या शेतकऱ्यांना वन खात्याच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात येणार आहे मात्र दाजीपूर अभयारण्यातून येणारी जंगली जनावरे ही सह्याद्री पट्ट्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे या जंगलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गवारेडा कळवप आणि सांबर (जंगली गाय )यांचा वावर वाढलेला आहे या रानटी जनावरांच्या कळपाने सह्याद्री पट्ट्यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान पोचवले आहे या  रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

353rd Shivrajyabhishek Day celebration held at Raigad Fort with Eknath Shinde
Marleshwar Temple waterfall safety advisory
Teacher Eligibility Test
Malvan resort swimming pool accident video viral
Marathi News Esakal
www.esakal.com