निसर्ग वादळामुळे सिंधुदुर्गातील नुकसान चार कोटींवर

Damage in Sindhudurg due to storm over Rs 4 crore
Damage in Sindhudurg due to storm over Rs 4 crore
Updated on

ओरोस : निसर्ग चक्रीवादळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा वाढला असून, चार कोटी 15 लाख 22 हजार 945 एवढे नुकसान झाले आहे. यामध्ये महावितरण व पाटबंधारे विभागाला बसलेल्या फटक्‍याचाही समावेश आहे. 

गेल्या आठवड्यात राज्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ थडकले होते. वादळाचा वेग जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर असण्याची शक्‍यता होती; प्रत्यक्षात तेवढ्या वेगाने वारे वाहिले नसले तरी वादळाची झळ बसली होती. त्यानंतर शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा आकडा 37 लाख 19 हजार 505 रुपये जाहीर केला होता; मात्र आज यात वाढ झाली आहे. जिल्हा आपत्ती कक्षाकडे पाटबंधारे, महावितरण यांच्या नुकसानीची भर पडली आहे. 

जिल्हा आपत्ती कक्षाकडून आज मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या नुकसानीची आकडेवारीत भर पडली असून, चार कोटी 15 लाख 22 हजार 505 रुपये एवढे नुकसान वाढले आहे. यामध्ये घरे व गोठे यांचे पूर्णतः व अंशता नुकसान झालेल्याचा आकडा 37 लाख 19 हजार 505 एवढा आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा व ग्रामपंचायत इमारती यांच्या नुकसानीचा आकडा 42 हजार 440 एवढा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतींचे नुकसान आठ हजार रुपये आहे. 

 हे पण वाचा - कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रत्नागिरीत अशी लढवली शक्कल...
https://www.esakal.com/kokan/prevent-corona-infection-independent-prison-gogte-college-ratnagiri-304542?amp

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे नुकसान 65 लाख एवढे झाले आहे. बंधाऱ्यांना झळ पोहोचली आहे. जिल्ह्यातील काजू कारखान्यांना याची बाधा झाली असून, एकूण 23 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळात सर्वात जास्त महावितरणचे दोन कोटी 89 लाख 53 हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती विभागाकडे सादर करण्यात आलेल्या पंचनाम्यात आहे. 

नुकसानीचा आकडा वाढणार 
चक्रीवादळ नुकसान चार कोटींवर पोहोचले असले तरी यात अजून वाढ होण्याची शक्‍यता आहे. अजून काही विभागांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांची आकडेवारी मिळायची असल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot
Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com