रत्नागिरी : अंदमानातून (Andaman) सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रिय राजकारणात भाग घ्यायचा नाही, या बंधनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Swatantra Veer Savarkar) रत्नागिरीत राजकीय बंदिवान म्हणून आणण्यात आले; परंतु प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगाव, गायवाडी येथील टिळकांचे अनुयायी (कै.) विष्णुपंत काशिनाथ दामले यांनी शिरगावात बोलावले. आपल्या घरातील धान्याचे कोठार रिकामे करून सावरकरांना तिथे ठेवले.