axe attack
sakal
दापोली - तालुक्यातील जालगाव-पांगारवाडी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आई-वडिलांवर त्यांच्या मुलाने कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २३) दुपारी घडली. या हल्ल्यात मधुकर आग्रे आणि त्यांच्या पत्नी अनिता आग्रे हे दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.