शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी: कदमांना डावलले ; दळवींना सर्वाधिकार

शिवसेनेत दोन गट; जबाबदारी पालकमंत्र्यांवर, दळवींच्या निवासस्थानी ए. बी. फॉर्मचे वाटप
Election
Election Esakal

दाभोळ (रत्नागिरी) : माजी पर्यावरणमंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे (Prasad Karve)यांच्यात झालेले कथित मोबाईल संभाषण उघड झाल्याचा फटका आता दापोली विधानसभा मतदारसंघाला बसू लागला आहे. दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार आमदार योगेश कदम (Yogesh Kadam)यांना न देता, ते अन्य नेत्यांना देण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दापोली व मंडणगड (Dapoli, Mandangad)नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्यावर दिली असून येथील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानी येऊन संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी मंगळवारी (ता. ७) उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना डावलून हे एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीमधून आलेल्यांना शिवसेनेकडून उमेदवारी

गेली पाच वर्षे शिवसेना व काँग्रेस दापोलीत सत्तेत होती. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद होते; मात्र या निवडणुकीत थेट राष्ट्रवादीजवळ आघाडी करून तब्बल नऊ जागा राष्ट्रवादी व आठ जागा शिवसेना व सत्तेत पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष व नंतर अडीच वर्षे शिवसेनेचा नगराध्यक्ष असा फॉर्म्युला पालकमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीजवळ केला असल्याची चर्चा सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश देत, दोन उमेदवारांना शिवसेनेकडून उमेदवारीही देण्यात आली आहे.

रामदास कदम यांच्यासाठी हा धक्का

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना विधानपरिषदेची पुन्हा उमेदवारी दिली नाही व आत्ता मंडणगड आणि दापोलीतील निवडणुकीची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे देणे, हा रामदास कदम यांच्यासाठी धक्का मानला जात असून शिवसेनेच्या वरिष्ठांनी आमदार योगेश कदम यांचे पंख कापण्याची तर सुरवात केली नाही ना, याची चर्चाही दापोलीत सुरू आहे.

एक नजर..

शिवसेना व काँग्रेस दापोलीत पाच वर्षे होती सत्तेत

या निवडणुकीत थेट राष्ट्रवादीशी केली आघाडी

राष्ट्रवादीला नऊ जागा व शिवसेनेला आठ जागा

पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होणार

नंतर अडीच वर्षे शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळेल

फॉर्म्युला ठरला; पालकमंत्र्यांची राष्ट्रवादीशी चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com