
Nagar Panchayat : दापोलीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडी सत्तेत
दाभोळ : दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले असून या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली व मंडणगड नगरपंचायतीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या आघाडी करण्यात आली होत त्यात दापोलीमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला असून दापोली नगरपंचायतीमध्ये या आघाडीला बहुमत मिळाले आहे.
दापोली नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी झालेल्या मतदानानंतर आज दापोली येथील तहसील कार्यालयात आज मतमोजणी झाली त्यात शिवसेना ६, राष्ट्रवादी ८, शिवसेवा विकास आघाडी २ व भाजप १ असे उमेवार निवडून आले आहेत.(Dapoli Nagar Panchayat election)
हेही वाचा: सोलापूर : तरुणाने बनवली बॅटरीवर चालणारी सायकल
यापूर्वी दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना ७, कॉग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी ४, भाजप २ असे पक्षीय बलाबल होते तर शिवसेना व कॉग्रेस यांची दापोली नगरपंचायतीमध्ये सत्ता होती, या निवडणुकीत कॉग्रेस व मनसे यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, राष्ट्रवादीला ४ जागांचा फायदा झाला आहे, शिवसेनेची १ व भाजपची १ जागा कमी झाली आहे तर कॉगेसच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४ जागा कमी झाल्या आहेत.
शिवसेनेच्या नेत्तृत्वाने आमदार योगेश कदम यांचेकडे या निवडणुकीची धुरा न देता त्यांना बाजूला ठेऊन माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचेकडे या निवडणुकीची धुरा सोपविली होती तर राष्ट्रवादीने माजी आमदार संजय कदम यांचेकडे या निवडणुकीचे नेतृत्व दिले होते, या दोन्ही माजी आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लाऊन दापोली नगरपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत मिळविले आहे.
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार
शिवसेनेचे आरिफ मेमन, नौशीन गिलगीले, ममता मोरे, रवींद्र क्षीरसागर, अझीम चिपळूणकर, शिवानी खानविलकर, राष्ट्रवादीचे खालिद रखांगे, मेहबूब तळघरकर, साधना बोत्रे, अन्वर रखांगे, रिया सावंत, संतोष कळकुटके, अश्विनी लांजेकर, विलास शिगवण, शिवसेवा विकास आघाडीच्या कृपा घाग व प्रीती शिर्के, भाजपच्या जया साळवी हे उमेदवार विजयी झाले आहेत.
Web Title: Dapoli Nagar Panchayat Election Shiv Sena Ncp Is In Power
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..