गावठी बनावट बंदूक प्रकरण: १२ बंदुका दापोली पोलिसांच्या ताब्यात

गावठी बनावट बंदूक प्रकरण: १२ बंदुका दापोली पोलिसांच्या ताब्यात
Updated on: 
Summary

दापोली तालुक्‍यातील साकुर्डे येथील विनोद बैकर हा युवक शिकारीसाठी गेला असता, पोटाजवळ गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता.

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील गावठी बनावटीच्या बंदूक प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अमित रहाटे यांनी दापोली पोलिसांना ३ गावठी बनावटीच्या बंदुका आणून दिल्या असून, पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आता जप्त केलेल्या बंदुकांची संख्या १२ झाली असून चार बंदुकांची अमितने विल्हेवाट लावली होती. या बंदुकांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. (dapoli police have seized 12 firearms in a village made gun case in dapoli taluka)

गावठी बनावट बंदूक प्रकरण: १२ बंदुका दापोली पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!

दापोली तालुक्‍यातील शिवाजीनगर भोंजाळी येथील अमित रहाटे याने दोन वर्षांपूर्वी पेंडूर (ता. कुडाळ) येथील न्हानू पेंडुरकर यांच्याकडून १६ गावठी बनावटीच्या सिंगल बोअरच्या बंदुका खरेदी केल्या होत्या. दापोली तालुक्‍यातील साकुर्डे येथील विनोद बैकर हा युवक शिकारीसाठी गेला असता, पोटाजवळ गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. विनोद बैकर याने शिकारीला जाताना वापरलेली बंदूक ही गावठी बनावटीची असल्याचे निष्पन्न झाल्यावर विनोद बैकर याला ही बंदूक कोणी दिली, याचा तपास दापोली पोलिसांनी सुरू करताच त्यांना या बंदुका विकणाऱ्याचा ठावठिकाणा लागला.

गावठी बनावट बंदूक प्रकरण: १२ बंदुका दापोली पोलिसांच्या ताब्यात
कोरोनाकाळ ठरतोय बालविवाहकाळ; सांगली जिल्ह्यात रोखले पंचवीस बालविवाह

या प्रकरणाचा सूत्रधार अमित रहाटेपर्यंत दापोली पोलिस पोचले. त्याने पेंडूर येथील न्हानू पेंडुरकर याच्याकडून १६ गावठी बनावटीच्या सिंगल बोअरच्या बंदुका विकत घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर अमित रहाटेने या बंदुका कोणाला विकल्या, याची माहिती दिल्यावर पोलिसांनी ज्यांनी या बंदुका विकत घेतल्या होत्या, त्यांच्याकडे छापे मारून या बंदुका जप्त केल्या. अमित रहाटेला जेव्हा अटक केली, तेव्हा त्याच्याकडे ३ बंदुका शिल्लक होत्या; मात्र न्यायालयाने अमितला जामिनावर मुक्‍त केल्यावर या बंदुका रहाटेकडून कशा मिळवायच्या? असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता; मात्र अमितने पंचांसमक्ष या ३ बंदुका पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. (dapoli police have seized 12 firearms in a village made gun case in dapoli taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com