

Villagers from Dapoli protest against the proposed nuclear power, bauxite mining and Navenagar projects at the tehsil office.
esakal
दापोली, : दापोली तालुक्यातील दाभोळ (आघारी-भिवबंदर) अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव येथील बॉक्साइट मायनिंग प्रकल्प आणि देवके येथील नवेनगर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आज दापोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेती-बागायती, जलस्रोत, पर्यावरण, मत्स्यव्यवसाय आणि गावांच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करीत हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले