

Pune
esakal
राधेश लिंगायत
दापोली: निसर्ग चक्रीवादळानंतर वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पाच्या कामामुळे दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्युत वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते, गटारे आणि नाले दुरुस्त न करताच तसेच सोडण्यात आल्याने पावसाळ्याच्या तोंडावर अपघाताची भीती निर्माण झाली असून, महावितरण कंपनी आणि संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.