जनता कर्फ्यूचा निर्णय जनतेवरच

decision of janata curfew in malwana konkan sindhudurg
decision of janata curfew in malwana konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) -: शहरातील जनता कर्फ्यूचा निर्णय जनतेवरच सोपवण्याचा निर्णय पालिकेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत नगराध्यक्षांना टोला लगावताना केवळ व्यापाऱ्यांनी विरोध केला म्हणून जनता कर्फ्यू नाकारणे चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांना पाचारण करून त्यांच्यावरच हा निर्णय सोपवावा, असे नगरसेवक जगदीश गावकर यांनी सांगितले. त्यानुसार मंगळवारी (ता. 22) सायंकाळी 4 वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निमंत्रितांची बैठक आयोजित करण्याचे ठरले. 

या बैठकीस व्यापारी, मच्छीमार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, रिक्षा व्यावसायिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मालवणात जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात नगरसेवकांची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक यतीन खोत, दीपक पाटकर, गणेश कुशे, मंदार केणी, नितीन वाळके, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, ममता वराडकर, पूजा सरकारे, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, शीला गिरकर, तृप्ती मयेकर आदी नगरसेवक उपस्थित होते. 

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरात जनता कर्फ्यू लावण्याबाबत जनतेकडून विचारणा होत असल्याने आपण काल व्यापाऱ्यांशी चर्चा केली यात व्यापारी संघाने जनता कर्फ्यूला विरोध केल्याचे सांगितले. मंदार केणी, यतीन खोत यांनी व्यापाऱ्यांचा विरोध असेल तर असा बंद ठेवता येणार नसल्याचे मत व्यक्त करत तूर्तास जनता कर्फ्यू नको असे सांगितले. 

नगराध्यक्ष जनतेचे 
नगरसेवक जगदीश गावकर म्हणाले, नगराध्यक्ष हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, तुम्हाला केवळ व्यापाऱ्यांनी निवडून दिले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांशी चर्चा करणेच चुकीचे होते. मालवणची परिस्थिती कुडाळ, कणकवली सारखी भीषण होऊ नये. त्यामुुळे जनतेलाच बोलावून सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com