esakal | चिपी विमानतळावरून आमदार केसरकरांचा राणेंना नाव न घेता टोला
sakal

बोलून बातमी शोधा

चिपी विमानतळावरून आमदार केसरकरांचा राणेंना नाव न घेता टोला

चिपी विमानतळासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून केंद्राकडून परवानग्या घेण्यात आल्या आहेत.

चिपी विमानतळावरून आमदार केसरकरांचा राणेंना नाव न घेता टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : चिपी विमानतळावरून (Chipi Airport) वाद निर्माण होणे दुर्दैवी आहे. केंद्र शासनाच्या परवानग्या लागल्या तरी चिपी विमानतळ हे महाराष्ट्र (Maharashtra) शासनाचे आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकारही राज्य शासनानाच आहे. काहींना केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याची ईच्छा आहे. मात्र गणपती त्यांना चांगली बुद्धी देवो अशी टीका आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव न घेता केली. आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विमानतळावरून नारायण राणे यांना चांगलाच चिमटा काढला.

यावेळी केसरकर म्हणाले, चिपी विमानतळासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून केंद्राकडून परवानग्या घेण्यात आल्या आहेत. मुळात या विमानतळावरून राज्य आणि केंद्र सरकार असा संघर्ष होऊ नये, अशी आपली इच्छा आहे. विमानतळ हे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सुरुवातीपासूनच गती देण्याचा प्रयत्न केला. आज याठिकाणी विमान वाहतूक सुरू होणार आनंदाची गोष्ट आहे. या आनंदाच्या प्रसंगात विघ्न आणले याचा कोणीही प्रयत्न करू नये. जर कोण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तर गणपती त्याला चांगली बुद्धी देवो.

हेही वाचा: रत्नागिरीतल्या पावसाने आठवला चिपळूणचा महापूर

केसरकर पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचे कर्तव्य वेगवेगळी असल्याने दोघांची भूमिका नेहमी समन्वयाची राहणे गरजेचे आहे. मात्र हा संघर्ष सुरू झाल्यास तो कोकण, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या हिताचा असणार नाही. काहींची राजकीय इच्छाशक्ती असल्याने ते हा वाद निर्माण करून फायदा बघत आहे. चिपी विमानतळासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले आहेत, येथील पर्यटन वाढावे, उद्योग-व्यवसाय वाढावे हा प्रत्येकाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे विमान वाहतूक सुरू झाल्यास सिंधुदुर्गसाठी आनंदाची गोष्ट ठरणार आहे.

अलीकडे संघर्ष तसेच राजकारणापासून काहीसा लांब आहे, मात्र तसे असले तरी जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध आहोत. मतदारसंघात ज्या लोकांना आपण शब्द दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी आपला नियमित प्रयत्न राहिला आहे. लवकरच रेडी येथे तिलारी येथील ॲम्युझमेट पार्क याप्रकल्पाप्रमाणे नविन प्रकल्प आणणार आहे. यातुन अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. लवकरच याबाबत आपण घोषणा करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा: बाप्पासाठी तुम्हीच तयार करा आकर्षक आरास; जाणून घ्या टिप्स

loading image
go to top