‘शिक्षणमंत्री झाल्याने नाराज नाही’ - दीपक केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar statement on Education Minister post cabinet expansion Maharashtra politics

‘शिक्षणमंत्री झाल्याने नाराज नाही’ - दीपक केसरकर

ओरोस, (जि.सिंधुदुर्ग) : शालेय शिक्षणमंत्री पद मिळाल्याने मी नाराज नाही. शिक्षण धोरण वारंवार बदलून चालणार नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण निर्णय घेतले जातील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शालेय शिक्षणमंत्री पद मिळाल्याने मी नाराज असल्याबाबत बोलले जात आहे; पण मी नाराज नाही. खातेपाटप झाल्यानंतर उद्योग, पर्यटनसारख्या खात्यात विकास करण्याची ताकद आहे. शिक्षण खात्यात नाही, असे बोललो होतो. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला; पण मी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘मी अजून पदभार स्वीकारलेला नाही. हा विभाग महत्त्वाचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर पगारासाठी होत असलेल्या खर्चाच्या ५० टक्के खर्च शिक्षकांवर होत असतो. त्यामुळे निर्णय घेताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. शिक्षण व्यवस्थेत अचानक मोठे बदल करता येणार नाही. तसे केल्यास त्याचा दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावर होऊ शकतो. बदल करायचा झालाच, तर जुना निर्णय घेताना नेमका कोणता उद्देश होता, याचा अभ्यास करून गरज असलेला बदल केला पाहिजे.’’

Web Title: Deepak Kesarkar Statement On Education Minister Post Cabinet Expansion Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..