esakal | 'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'
sakal

बोलून बातमी शोधा

'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'

नाकर्त्या सत्ताधीशांच्या अकार्यक्षम कारभारामुळे, इच्छाशक्तीच्या अभावामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत

'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गजाननाचे आगमन होत असल्याने सर्वजण आनंदात आहेत. सणाची लगबग आणि आवडत्या गणेशाच्या स्वागताचा हर्षोल्लास घराघरांत आहे. गणेशाकडे सर्वांसाठी सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य मागतानाच रत्नागिरी शहराची चाललेली दुर्दशा संपू दे आणि रत्नागिरीत साचलेल्या चिखलात कमळ फुलून रत्नागिरी शहराला कार्यक्षम नवे कारभारी देऊन शहर सुंदर बनवण्याचे वरदान दे, अशी प्रार्थना द. रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, यावर्षी सर्वत्र असणारे खड्डेमय रस्ते, अपूर्ण बांधकाम, रस्त्यात फिरणारी उनाड गुरे, रखडलेली पाणीयोजना अशा अनेक समस्या रत्नागिरीकरांच्या माथी मारल्या गेल्या आहेत. नाकर्त्या सत्ताधीशांच्या अकार्यक्षम कारभारामुळे, इच्छाशक्तीच्या अभावामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि यामुळे रत्नागिरीची दुर्दशा झाली आहे.

हेही वाचा: पालिका रणांगण - दलबदलू राजकारणाला वेग, शिवसेनेलाच पसंती

समस्यांबद्दल ते म्हणाले, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत तारांगण, बंद पडणाऱ्या मराठी शाळा, पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्यात होणारी कोंडी, दिशाहीन धोरणाने विकास प्रक्रिया ठप्प झाली. अव्वाच्या सव्वा खर्च वाढवून बिले वाढवण्याच्या उद्देशाने वापरात येणाऱ्या योजना, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टिम उभारण्याच्या होणाऱ्या केवळ वल्गना केल्या जात आहे. गणेशा, तुझ्या आगमनाची दखल घेत तरी पालिकेतील सत्ताधीश जागे होतील, ही आशाही फोल ठरली. आता श्रीगणेशा तूच ही दुर्दशा थांबव व मुळात सुंदर असलेली रत्नागिरी विकासाच्या मार्गावर गतिमान व्हावी, अकार्यक्षमतेच्या खड्ड्यांमध्ये निर्माण झालेल्या चिखलातून सुंदर कमळ फुले उगवावीत.

शहर सुंदर बनवण्याचे वरदान दे..

शहरवासीयांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, स्वच्छ राहील, अशी ड्रेनेज सिस्टिम, निश्चित धोरणे ठरवून चालणाऱ्या दर्जेदार मराठी शाळा, स्वच्छ गतीमान प्रशासन रत्नागिरीकरांना हवे आहे. शहराला कार्यक्षम नवे कारभारी देऊन शहर सुंदर बनवण्याचे वरदान दे, अशी प्रार्थना ॲड. पटवर्धन यांनी आहे.

हेही वाचा: Konkan Railway - आरक्षण नसलेल्या चाकरमान्यांना स्थानकात नो एंट्री

संयमी रत्नागिरीकर

सोशिक संयमी रत्नागिरीकर शहरातल्या प्रत्येक रस्त्यातल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत गेले सहा महिने वावरत आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती आहे. आगामी चार महिन्यांत पालिकेची निवडणूक होणार आहे. त्या वेळी मते मागायला येणाऱ्या नाकर्त्या सत्ताधाऱ्यांना नक्की जागा दाखवू, अशी शपथ रत्नागिरीकरांनी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top