esakal | रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रूग्ण नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

'रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रूग्ण नाही'

'रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रूग्ण नाही'

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील (sangmeshear) काही गावांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट या नवीन (delta plus variant) स्टेनचा कोणताही रुग्ण सापडलेला नाही. याबाबत काही लोकांचे नमुने यापूर्वी पाठविण्यात आले आहेत. आणखी १०० लोकांचे नमुने नुकतेच पाठविण्यात आले. याचा अहवाल येऊन जोवर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट हे जाहीर करत नाही, तोवर याबाब लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. जिल्ह्यात (ratnagiri district) नऊ रुग्ण सापडले आहेत. मात्र ते कोणत्या स्टेनचे आहेत. हे अजून स्पष्ट झालेले नाही आणि नवीन स्टेन आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात योग्य ती खबरदारी घेतली आहे. यामध्ये लपवाछपवी करण्याचा काही संबंध नाही, असा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केला.

झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्याच्या आरोग्य विभागाच्या निकषावर जिल्ह्यात कोरोना महामारीवर (corona) काम सुरू आहे. मात्र आज संगमेश्वर तालुक्यातीतल काही गावांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट या नवीन स्टेनचे रुग्ण सापडल्याचे प्रसार माध्यमांनी छापले आहे. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट या स्टेनचा कोणताही रुग्ण संगमेश्वर तालुक्यात सापडलेला नाही. तेथील सुमारे ५ हजार २०० नागरिकांची तपासणी झाली आहे. ५० ते ५२ लोक पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा: कोकण : गावखडीत वादळापासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत हा भाग येतो. त्यामुळे संगमेश्वर बाजारपेठ किंवा अन्य भागात डेल्टा प्लसचा रुग्ण सापडल्याचे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने अजून जाहीर केलेले नाही. नागरिकांनी घाबरू जाऊ नये तसेच अफवाही पसरवू नये. जिल्ह्यातील बरेच नमुने आम्ही तपासणीसाठी पाठविले आहेत. कोरोनाचा हा स्टेन दिवसाला बदलतो. आता परत १०० नमुने पाठविण्यात आले आहेत. नवी मुंबई, पालघर आदी ठिकाणी या स्टेनबाबत माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आम्ही सतर्कता बाळगली आहे. प्रसार होणार नाही, याची खबरदार घेऊन नाकाबंदी केली आहे.

मोबाईल टीम ठेवली असून बाजारपेठही बंद केली आहे. मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी वाढल्याचे अजून दिसून आलेले नाही. आता पॉझिटिव्ह रेट कमी येत आहे. चाचण्या वाढवल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण ४ हजार ८०० पर्यंत आले आहेत. सर्वांना विनंती आहे की जोवर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जाहीर करत नाही, तोवर अशा प्रकारची माहिती देण्यात येऊ नये. राज्य शासनाकडुन याची अधिकृत माहिती दिली जाईल. ज्यांनी कोणी ही माहिती छापली त्यांच्याकडुन खुलासा मागवू. त्यांना कुठुन माहिती मिळाली आणि शासनाकडुन आली असेल तर ती आम्हाला द्यावी. कोणीही याला दुसरे नाव देण्याचा प्रयत्न करू नये, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: माजी मंत्री देणार आमदारकीचा राजीनामा?

पॉझिटिव्ह रेट १० टक्केपेक्षा कमी

जिल्ह्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या आक्सिजन बेड ४० टक्के आहे. तर ६० टक्के बेड रिकाम्या आहेत. पॉझिटिव्ह रेट १० टक्केपेक्षा कमी आला आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शनानुसर लवकरच शिथिलतेबाबत निर्णय घेतला जाईल. धबधबे, पर्यटन स्थळे, बिचेसवर निर्बध लावण्याबाबतही लवकच निर्णय होईल. जिल्ह्यात प्रवेशासाठी चाचणी सुरू राहणार आहे. लसीकरण झाल्यानतंर पुढील निर्णय होईल, पण आपण जिल्ह्यात येणाऱ्यांची टेस्टिंग करतोय, असेही मिश्रा यांनी सांगितले.

loading image