लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या मासेमारीवर निर्बंध घालण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या एलईडी, पर्ससीननेटची मासेमारी राजरोसपणे सुरू आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले असून संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतरही एलईडी, पर्ससीननेटची मासेमारी सुरू आहे. यावर निर्बंध आणण्यास केंद्राला अपयश आले आहे.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी, पर्ससीननेटची मासेमारी सुरू आहे. यावर केंद्र निर्बंध आणू शकत नाही, याची खंत आहे. जिल्ह्यात मासे वाहतूकीस बंदी नाही; मात्र मासे कोठून येतात? वाहतूक कशी होते? यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश ऊर्फ बाळू अंधारी यांनी येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या एलईडी, पर्ससीननेटची मासेमारी राजरोसपणे सुरू आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले असून संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतरही एलईडी, पर्ससीननेटची मासेमारी सुरू आहे. यावर निर्बंध आणण्यास केंद्राला अपयश आले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईहून रत्नागिरीत जलमार्गे येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या; मात्र एलईडी, पर्ससीननेटची मासेमारीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध किंवा बंदी घालण्यास केंद्र अपयशी ठरले आहे. सध्या स्थानिक मच्छीमारांनी मासेमारी बंद केली असताना जिल्ह्यात मासे येतात कोठून? त्याची वाहतूक कशी होते? याची माहिती घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्री. अंधारी यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand Of Ban On Fishing In Lockdown Sindhudurg Marathi News