वाशिष्ठीतील गाळ काढण्याची मागणी मान्य

बुधवारी घोषणा अपेक्षित; चिपळूणकरांच्या लढ्याला यश
वाशिष्ठीतील गाळ काढण्याची मागणी मान्य

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणकरांनी सुरू केलेल्या लढ्याला मोठे यश आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईतील बैठकीत दीड तास चर्चेअंती चिपळूणवासीयांची मागणी मान्य केली. बुधवारी (ता. १५) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अल्प आणि दीर्घकाळ अशा दोन टप्प्यात वाशिष्ठीतील गाळ काढण्याच्या निर्णयावर सर्व मंत्र्यांनी बैठकीत शिक्कामोर्तब केले असून त्याला बुधवारी मूर्त स्वरूप मिळणार आहे.

चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणवासीयांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री थोरात यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, ‘‘गाळ काढावाच लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महसूलचा विषय असेल तो निश्चितपणे युद्धपातळीवर हाताळला जाईल. जुवाडे, बेटे ताब्यात घेऊन ती काढून टाकण्याची कार्यवाही त्वरित करू.’’ वेळ फार कमी आहे. त्यामुळे तातडीने या कामाला सुरुवात झाली पाहिजे, असे सांगत गाळ काढण्याला पूर्णतः मान्यता दिली.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘विषय फार गंभीर आहे. मी स्वतः पाहणी केली आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण विभाग पूर्ण तयार असून कोणतीही अडचण येणार नाही. जे लागेल ते सर्व सहकार्य मी करेन. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे सुरवातीला ५ महिने व नंतर दीर्घकाळ अशा दोन टप्प्यात गाळ काढण्याचे प्रयोजन करू या. माझ्या विभागाच्या सर्व परवानग्या मी लगेच देतो.’’

वाशिष्ठीतील गाळ काढण्याची मागणी मान्य
वाहन चालवताना मोबाईलवर बोलताय? होणार तब्बल इतका दंड; वाहन कायदा लागू

जलसंपदामंत्री म्हणाले, ‘‘मी प्रत्यक्षात या संदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. यांत्रिक विभागाला आदेश दिलेले आहेत. माझ्याकडून पूर्ण सहकार्य राहील. मी तत्काळ सर्व यंत्रसामुग्री पाठविण्याची व्यवस्था करतो.’’ अस्लम शेख म्हणाले, ‘‘मेरीटाईम विभागाकडूनदेखील कोणतीच अडचण येणार नाही. तशा सूचना मी आजच देतो.’’ आमदार शेखर निकम, तसेच मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली.

समितीला ठाम आश्वासन

वाशिष्ठीतील गाळ काढणे या विषयावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या पूर्वी पुन्हा सर्व संबंधित मंत्री व अधिकारी एकत्र बसून प्रस्ताव तयार करतील व अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटसमोर ठेवून निर्णय घेतला जाईल, असे ठाम आश्वासन चिपळूण बचाव समितीला यावेळी देण्यात आले. त्यावर तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून शासनाकडून लेखी ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, अशी भूमिका चिपळूण बचाव समितीतर्फे अरुण भोजने, शहनवाज शहा, राजेश वाजे, सतीश कदम व किशोर रेडीज यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com