esakal | काजू - आंबा खरेदीसासाठी  बिनव्याजी अर्थसहाय्य देण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Demand Of Loan For Purchase Of Cashw Mango

माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर येथील विनाशकारी पेट्रोकेमिकल रिफायनरीची तळी उचलताना या कंपनीच्या माध्यमातून आंबा खरेदी करावी, अशी पेर्टोलियन मंत्र्यांकडे केलेली मागणी हास्यास्पद आहे.

काजू - आंबा खरेदीसासाठी  बिनव्याजी अर्थसहाय्य देण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या विकासामध्ये सहकार चळवळीचे मोठे योग्यदान आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व तालुका शेतकरी खरेदी - विक्री संघांनी शेतकऱ्यांकडून थेट काजू - आंबा बाजारभावाने खरेदी करावा, या कामी दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी बॅंकांनी या संघांना बिनव्याजी अर्थसहाय्य करावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोहन केळुसकर यांनी केली आहे. 

माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर येथील विनाशकारी पेट्रोकेमिकल रिफायनरीची तळी उचलताना या कंपनीच्या माध्यमातून आंबा खरेदी करावी, अशी पेर्टोलियन मंत्र्यांकडे केलेली मागणी हास्यास्पद आहे. जगामध्ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजवला असताना आणि त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना अशा वेळी एखाद्या विनाशकारी प्रकल्पाची तळी उचलणे म्हणजे समस्त नागरिकांचा अपमान आहे. अशा दलालांना रोखण्याची ताकद आम आदमीच्या मनगटात आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

तालुका खरेदी - विक्री सहकारी संघ हे शेतकरी - बागायतदार यांच्याकडील उत्पादीत मालांच्या खरेदीसाठी स्थापन झाले आहेत. कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील हे संघ ही भुमिका निभावतात. हीच भुमिका कोकणातील या संघांनी उचलावी, असे श्री. केळुसकर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, "" कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांनी काजुचे दर पाडले आहेत. ते शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत आहेत. हापुस आंबा तर नाशिवंत आहे. अशा परिस्थितीत या संघांनी शेतकरी बागायतदारांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याकडून योग्य भावाने आंबा खरेदी करून ग्राहकांना माफक दरात विकावा. या संघांना जिल्हा बॅंकांनी अर्थसहाय्य करावे.'' 
 

loading image