esakal | देवगड : दोन लसीचे डोस पुर्ण झालेल्यांची चाचणी केली जाणार नाही.
sakal

बोलून बातमी शोधा

deogad

देवगड : दोन लसीचे डोस पुर्ण झालेल्यांची चाचणी केली जाणार नाही.

sakal_logo
By
संतोष कुलकर्णी

देवगड : गणेश चतुर्थी उत्सव काळात शहरात येणार्‍या चाकरमान्यांपैकी दोन लसीचे डोस पुर्ण झालेल्यांची तसेच 18 वर्षाखालील मुलांची कोरोना चाचणी केली जाणार नाही. अन्यथा सर्वांची चाचणी केली जाणार असल्याचे नियोजन येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने घेण्यात आलेल्या सभेत करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली.

येथील नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा साळसकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेश चतुर्थी नियोजन सभा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, नगरसेविका प्रणाली माने यांच्यासह अन्य नगरसेवक आणि पोलीस उपस्थित होते. परजिल्ह्यातून येणार्‍या नागरीकांनी लसीचे दोन डोस घेतले असल्यास तसेच 18 वर्षाखालील मुलांची लस उपलब्ध नसल्याने तसेच आर.टी.पी.सी.आर. 72 तास पुर्वीचा अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांना कोरोना चाचणी अहवाल आवश्यक नाही. परंतु दोन डोस घेऊनही ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे निदर्शनास आल्यास त्यांची तपासणी करण्यात येईल असे आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींमार्फत सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: 'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

देवगड जामसंडे शहरामध्ये गणेश चतुर्थी कालावधीमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदी करण्याकरीता येणार्‍या ग्राहकांना त्यांच्या वाहन पार्कींगसाठीची नगरपंचायत व पोलीस प्रशासनामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये देवगड तहसीलदार कार्यालयाशेजारी मोकळ्या जागेत, देवगड बसस्थानक, निखील हॉटेल शेजारी खुल्या क्षेत्रामध्ये, देवगड सारस्वत बँक समोरील खुल्या जागेमध्ये, जामसंडे येथील गोगटे हायस्कूल मैदान, वाडातर रस्त्यावरील खुल्या जागेमध्ये वाहनांसाठी पार्किग व्यवस्था करण्यात येईल. देवगड जामसंडे नगरपंचायतीकडून पार्कींग असे फलक उभारण्यात येतील. देवगड जामसंडे बाजारपेठांमध्ये खरेदी करीता येणार्‍या नागरीकांनी व व्यापार्‍यांनी माक्स व सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रत्येक विसर्जनस्थळी देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनामार्फत निर्माल्य कलश तसेच नगरपंचायत कर्मचारी व पोलीस यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली आहे.

देवगडचा बाजार 9 ला भरवावा

गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्रवार (ता.10) येत असल्यामुळे देवगड येथे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत असलेला बाजार देवगड व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करुन गुरुवारी (ता.9) भरविण्यात यावा असे व्यापार्‍यांना सांगण्यात आले आहे.

loading image
go to top