वृद्ध कलाकार मानधनापासून वंचित; सिंधुदुर्गात 100 प्रस्ताव प्रलंबित

Deprived of old artist honorarium 100 proposals pending in Sindhudurg
Deprived of old artist honorarium 100 proposals pending in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील 837 वृद्ध कलाकारांना शासनाकडून दरमहा 2250 रुपये मानधनाचा लाभ दिला जात आहे. 2019 मध्ये नव्याने निवड करून पाठविलेले 100 प्रस्ताव अद्यापही शासनाकडे प्रलंबित असून मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली. 

भजन, दशावतार यांसारख्या कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या वृद्ध कलाकारांना मानधन देण्याची योजना शासनाकडून राबवली जात असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 837 वृद्ध कलाकार या योजनेचा लाभ घेत आहेत.

शासनाकडून वृद्ध कलाकारांच्या बॅंक खात्यावर दरमहा 2250 रुपये एवढे मानधन जमा केले जात आहे; मात्र 2019 मध्ये जिल्हास्तरीय वृद्ध कलाकार मानधन निवड समितीने निवड केलेल्या 100 कलाकारांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यांना मानधनाची प्रतीक्षा आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत नव्याने 218 वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावातून 100 वृद्ध कलाकारांची जिल्हास्तरीय निवड समिती निवड करणार आहे. 

वृद्ध कलाकार मानधन योजनेसाठी कलाकारांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय वृद्ध कलाकार मानधन निवड समितीसमोर हे प्रस्ताव ठेवले जातात. प्राप्त प्रस्तावातून यापूर्वी 60 प्रस्तावांची निवड केली जात होती; मात्र वृद्ध कलाकारांची संख्या आणि वय पाहता मर्यादित 60 प्रस्तावांची निवड होत असल्याने अनेक वृद्ध कलाकारांना या योजनेपासून वंचित राहावे लागत होते. यासाठी शासनाने आता 60 ऐवजी 100 प्रस्तावना मंजुरी देण्याचा निर्णय घेतल्याने आता दरवर्षी 100 कलाकारांची निवड केली जात आहे. त्यानुसार 2019 मध्ये प्राप्त प्रस्तावातून 100 कलाकारांची निवड करून जिल्हास्तरीय निवड समितीने शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत; परंतु अद्याप या प्रस्तावाना शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्याने हे कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. 


पात्र कलाकारांची लवकरच निवड 
2020 मध्ये नव्याने 237 वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाकड़े प्राप्त झाले असून या प्रस्तावातून जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीत 100 पात्र वृद्ध कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com