देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीला पोषक वातावरण

देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात शास्वत विकास झाला नसल्याने स्थानिक जनता कंटाळली आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीला पोषक वातावरण
Updated on: 

देवगड - देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात शास्वत विकास झाला नसल्याने स्थानिक जनता कंटाळली आहे. नागरिक पर्यायाच्या शोधात असून शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीला पोषक वातावरण असून नगरपंचायतीवर सत्तापालट होईल, असा दावा शिवसेना नेते आणि नगरपंचायत निवडणूक निरीक्षक संदेश पारकर यांनी आज येथे केला. सत्ताधारी विकास कामे करण्यात अपयशी ठरल्याने जनतेने महाविकास आघाडीच्या मागे उभे रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील शिवसेना कार्यालयात नगरपंचायत निवडणूक प्रचार आणि एकूणच सद्यस्थितीवर श्री. पारकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संदेश सावंत-पटेल, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, "आमदार नीतेश राणे यांच्या विकासाला स्थानिक कंटाळले आहेत. गेल्या पाच वर्षात सत्ताधार्‍यांना शास्वत विकास करता आला नाही. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरपंचायतीला भरीव निधी देण्यात आला. मात्र सत्ताधार्‍यांना जनतेला प्राथमिक सुविधाही देता आल्या नाहीत.

नळपाण्याचा ज्वलंत प्रश्‍न सोडवता आला नाही. शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. आता नागरिकांवर पश्‍चाताप करण्याची पाळी आली आहे. आमदारांची विकासाची संकल्पना ही स्टंटबाजी असून कोणताही शास्वत विकास गेल्या पाच वर्षात झाला नाही. जनतेची सेवा करायची सोडून विकास कामांमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्याची वृत्ती सत्ताधार्‍यांमध्ये अधिक दिसली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सत्ताधार्‍यांनी नकोसे करून सोडले आहे."

देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सत्ताधार्‍यांच्या कार्यपध्दतीला शहरातील नागरिक वैतागले आहेत. याचा फायदा शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीला होईल. नागरिकांनी सत्तापरिवर्तन करून विकासाची संधी आघाडीला देण्याचे आवाहन संदेश पारकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver Scheme Ratnagiri
Patradevi excise checkpost ACB raid
Tree cutting for the Sai Dongar-1 project in Karjat has been halted amid growing opposition.
Sachin Tendulkar Ganpatipule temple visit today
Marathi News Esakal
www.esakal.com