देवगड ठरतोय ‘हॉटस्पॉट: या गावांना झालीय लागण

देवगड ठरतोय ‘हॉटस्पॉट: या गावांना झालीय लागण

देवगड : देवगड तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’(Devgad hotspot) ठरू पहात आहे. तालुक्‍यातील कोरोना सक्रीय रुग्णांची (Covid infected)आकडेवारी ४२० पर्यंत पोचली आहे. तोरसोळे गावात रॅपिड तपासणीत एकाचवेळी ५७ रुग्ण आढळल्याची माहिती आज येथे झालेल्या पंचायत समिती मासिक सभेत समोर आली. त्यामुळे नागरिकांनी आता पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्ताने गटविकास अधिकारी जयप्रकाश परब (Jayprakash Parab)यांनी केले.

Devgad taluka hotspot sindhudurg covid 19 marathi news

येथील पंचायत समितीची मासिक सभा आज ऑनलाईन झाली. यावेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर आदी उपस्थित होते. कोरोनाचा आढावा आरोग्य विभागाने ऑनलाईन दिला. यावेळी तालुक्‍यात ४२० सक्रीय रूग्ण आहेत. तर तोरसोळे गावात रॅपिड तपासणीत एकाचवेळी ५७ रूग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत १६ हजार ३२४ जणांनी लस घेतल्याची आकडेवारी देण्यात आली. हाच धागा पकडून कोविडची पहिली लस घेतलेल्यांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना गैरसोयीचे झाल्याकडे सदस्य सुनील पारकर यांनी लक्ष वेधले.

एकट्या मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ८८४ जण लशीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असून तालुक्‍याचा विचार करता आकडा वाढू शकतो, असेही त्यांनी मत नोंदवले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील तालुक्‍यातील सात मंजूर कामे अद्याप सुरू होत नसल्याबद्दल पारकर यांनी नाराजी व्यक्‍त करून यामागे काय कारण असावे? असा प्रश्‍न उपस्थित केला. आरे गावातील दूरध्वनी केंद्राची सेवा कोलमडत असल्याने नागरिकांना संपर्कासाठी अडचणी जाणवत असल्याकडे सदस्य अजित कांबळे यांनी लक्ष वेधले. यापूर्वी अवकाळी पावसावेळी आंबा पीक विमा अनुषंगाने झालेल्या कृषी सर्वेक्षण अहवालावर पारकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल निरंक दिल्यावरून कोणत्या शेतकऱ्यांना भेटला त्याची माहिती कृषी विभागाने देण्याची मागणी पारकर यांनी केली.

...ही ठिकाणेही हॉटस्पॉटच्या दिशेने

तालुक्‍यातील कातवण, किंजवडे, तोरसोळे, नाडण, पडेल, विजयदुर्ग आदी गावात कोरोना संसर्ग अधिक जाणवला. ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट ठरण्याची लक्षणे असल्याने नागरिकांनी आवश्‍यक काळजी घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com