

A video allegedly showing small boats surrounding a fishing trawler and looting its catch in the Devgad–Vengurla maritime area has prompted trawler fishermen to seek police action
esakal
देवगड : समुद्रात ट्रॉलरला घेराव घालून त्यातील मासळी लुटल्याचा कथित प्रकार समोर आला आहे. देवगड ते वेंगुर्ला सागरी हद्दीत घडलेल्या या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी पसरली आहे. काही छोट्या नौकाधारकांकडून ट्रॉलरमधील मासळीची संघटितपणे लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ट्रॉलर मच्छीमारांनी केली आहे.