

Two tourists drowned at Devkund Waterfall in Raigad after allegedly entering the prohibited area despite the monsoon tourism ban.
Sakal
पाली : माणगाव तालुक्यातील भिरा-पाटणूस हद्दीतील प्रसिद्ध देवकुंड धबधब्याच्या डोहात बुडून दोन तरुण पर्यटक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 12) दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली आहे. गोपाळ राठोड आणि विष्णू डोके (वय साधारण 23 ते 25 वर्षे) अशी डोहात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत.