

Rescue team recovering two youths from the deep pool at Devkund in Raigad after a drowning incident
esakal
अमित गवळे
पाली: माणगाव तालुक्यातील भिरा हद्दीतील प्रसिद्ध देवकुंड धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात अखेर सोमवारी (ता. 13) दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान यश आले आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि शेलार मामा रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांनंतर देवकुंडच्या अत्यंत धोकादायक आणि साधारण पन्नास फूट खोल डोहातून हे दोन्ही मृतदेह पंधरा मिनिटात बाहेर काढण्यात आले. गोपाळ राठोड (वय 23) आणि विष्णू ढोक (वय 24) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.\