

The initiative, held in memory of his late mother, reflects the true spirit of devotion, community service and Maharashtra's Warkari tradition.
Sakal
पाली : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती आणि सेवेचा सुरेख संगम पाहायला मिळाला आहे. पनवेल शिवकर येथील रहिवासी प्रसाद लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी शुक्रवारी (ता. 17) विशेष भोजनाचे आयोजन केले होते. सामाजिक बांधीलकी आणि वारकऱ्यांची सेवा या भावनेतून त्यांनी ही भोजन व्यवस्था केली. विशेष म्हणजे, प्रसाद गायकवाड हे गेल्या ५ वर्षांपासून हा कौतुकास्पद उपक्रम न चुकता आणि अत्यंत श्रद्धेने राबवत आहेत.