रिक्षावाले मामा बघताहेत वाट ; त्यांनाही हवाय शाळेच्या घंटेचा किणकिणाट

प्रमोद हर्डीकर
Wednesday, 9 September 2020

 

सहा महिने व्यवसाय नाही,हप्ते कसे भरायचे ?

साडवली (रत्नागिरी)  :शाळे शाळेत मुलांना रिक्षाने सोडणारे व संध्याकाळी परत शाळेतुन घरी आणुन सोडणारे रिक्षावाले काका आता हतबल झाले आहेत.सहा महिने शाळा बंद असल्याने रिक्षावाले काका मुलांची वाट पहात बसले आहेत.

देवरुख व साडवली परीसरातील बालवाडी,प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा आहेत.या शाळातुन मुलांना सोडण्याचे काम सन १९९० पासुन साडवली सह्याद्रीनगरचे महेश गुरव व संतोष गुरव हे काम करत आहेत.शाळेच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने फक्त मुलांनाच शाळेत सोडणे व घरी आणणे हाच त्यांचा व्यवसाय बनला.त्यामुळे इतर भाडी त्यांनी कधी मारली नाहीत की लाईनमध्ये त्यांनी कधी रिक्षा लावली नाही.यामुळे या लाॅकडाऊन मध्ये व शाळा बंद असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा- ईस्ट इंडिया कंपनीच्या शिपायाने रेखाटले होते कोल्हापूरचे वैभव

अगदी एक दोन मुलांना जबाबदारी ९० साली पार पाडली होती व नंतर हा व्यवसायच बनुन गेला व नंतर अनेक शाळा मिळाल्या असे महेश गुरव यांनी सांगितले.मार्च महिन्यात शाळा बंद झाल्या व आमचा व्यवसाय बंद झाला.रिक्षाची चाके जागेवरच थांबली.
मुलांना बालवाडी ते माध्यमिक शाळेत सोडण्याचे काम संतोष व महेश करत आहेत.यामुळे अनेक कुटुंबांशी ते जोडले गेले आहेत.ज्यांना शाळेत सोडत होतो ते आता नोकरीला लागुन आई-बाबा झाले आहेत व त्यांची मुले आम्ही आता शाळेत सोडत आहोत अशी दुसरी पिढी शाळेत जायला लागली आहे असा हा कौंटुबिक व्यवसाय बनला आहे.

देवरुख साडवली परीसरात मुलांना रिक्षातुन शाळेत सोडणारे किरण कांबळे,भाया खामकर,दिनेश झगडे,मकरंद मांगले,बाळा मांगले अशी मंडळी आहेत यांचाही हाच अनुभव आहे.आता चार पाच वर्षापुर्वी काही शाळांनी मुलांसाठी बसची सोय केली आहे.काही व्हॅन्स आहेत तरी रिक्षातुन मुलांचे जाणे यैणे थांबलेले नाही हे विशेष आहे.आता कोरोनाचे हे पर्व थांबु दे व शैक्षणिक पर्व सुरु होवुन आमचा मुलांशी सुसंवाद घडु दे अशी अपेक्षा महेश व संतोष गुरव बंधुनी व्यक्त केली.

हेही वाचा- खासदार मंडलिक यांच्या कार्यकर्त्याचा या नंबरासाठी आहे आग्रह

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devrukh Sadvali area children are dropped off at school by rickshaw auto vehicle uncle story in sadavali ratnagiri