
पाली - नुकतेच शेकापतून भाजपमध्ये दाखल होऊन राज्यसभेचे खासदार झालेले धैर्यशील पाटील यांची खासदारकी अवघ्या 17 महिन्यांची आहे, असे वक्तव्य शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
रविवारी (ता. 25) सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या ठिकाणी स्वर्गीय नामदेवशेठ खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सुशीलाताई नामदेव शेठ खैरे रंगमंच याचे उद्घाटन तसेच विद्यालयाचे प्राचार्य संभाजी गणपत ढोपे यांचा सेवापूर्ती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रमात जयंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.