गणपतीसाठी ढोल-ताशा-ध्वज पथक सज्ज...

अमित गवळे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पाली (रायगड) : लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपारीक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. गणपती जवळ अाल्याने तर जिल्ह्यातील ढोलताशा पथक जोमाने तयारीला लागले आहेत. यावेळी अापल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच्याच ह्रदयाचा ठेका चुकवितात.

पाली (रायगड) : लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपारीक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. गणपती जवळ अाल्याने तर जिल्ह्यातील ढोलताशा पथक जोमाने तयारीला लागले आहेत. यावेळी अापल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच्याच ह्रदयाचा ठेका चुकवितात.

पारंपारिक संस्कृती टिकावी अाणि तरुणांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक ढोल-ताशा-ध्वज पथक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात साधारण ३०-३५ ढोलताशा पथक अाहेत. सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी बहुतांश ढोलताशा पथकातील सदस्य सध्या सरावातून अतोनात मेहनत घेत आहेत. सकाळने या संपर्ण ढोलताशा ध्वज पथकाची घेतलेली हि रंजक माहीती. डिजे व डाॅल्बी पेक्षा अाता पारंपारीक वाद्यांकडे सगळेच जण अाकृष्ट होत आहेत. गणेश चतुर्थी, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये हमखास ढोल-ताशा पथक अापल्या पारंपारीक कलेचा नमुन मोठ्या प्रमाणात सादर करतांना दिसतात. काही ढोलताशा पथक अनेक सामाजिक उपक्रम देखिल राबवितात. गणपतीमध्ये गणेशापुढे मानवंदना दिली जाते.

प्रचंड मेहनत
महाड येथील जगदंब ढोल-ताशा-ध्वज पथकाचे संस्थापक अध्यक्ष रोहन धेंडवाल यांनी सकाळला सांगितले कि. गणपती निमित्त जवळपास दिड महिना अाधीपासून सराव सुरु होतो. महाड, माणगाव या शाखेत सायंकाळी ५ ते ८ या वेळेत जंगी सरवा चालतो. पथकात साधारण ८ ते ९ वयोगटापासून ४५ वर्षे वयोगटाचे २०० पेक्षा अधिक सदस्य अाहेत. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. काही पथक सदस्यांकडून शुल्क घेतात तर काहि घेत नाहीत.

नवीन ठेका व ताल
बहुतांश ढोल पथक अापला नवीन ठेका व ताल यांचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतात. यात १ ते ५ असे पारंपारिक ताल असतात. याला पारंपारिक हात चालविणे असेही म्हंटले जाते. लोक अानंदी होऊन डोलू व नाचू लागतील अशा ठेक्यांना अधिक पंसती मिळते.

नियमांचे पालन
प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे असे काही नियम असतात. ते प्रत्येक सदस्यांना तंतोतंत पाळावे लागतात. त्यामध्ये व्यसनाधिनता व गैरवर्तन चालत नाही. सरावास नियमित हजर राहणे, ठरविलेला गणवेश परिधान करावा, मुलींनी मुलींचा ढोल स्वतः ताणावा (ओढावा) व त्यांनीच तो उचलावा., पालकांची परवानगी अावश्यक, रात्री उशीर झाल्यास मुलिीना घरी सोडण्यास जाणे. अाणि सर्व सदस्यांनी शिस्तीचे व नियमांचे पालन करावे.

साहित्य
कोणत्याही ढोलताशा पथकात प्रामुख्याने ढोल, ताशा, टोल, ध्वज (ध्वजावर मानाचा कळस) टोल गाडी व झांज अादी साहित्याचा समावेश असतो. वेळोवेळी या सर्व साहित्याची योग्य देखभाल देखिल करावी लागते.

अापली संस्कृती जोपासण्यासाठी व तरुणांमध्ये विवीध कौशल्ये विकसित होण्यासाठी ढोलताशा ध्वज पथक सुरु केले. लहान मुलांसह तरूण मोठ्या प्रमाणात या पारंपारीक वादनाकडे अाकर्षित होत आहेत. हि जणू एक नशा आहे. कित्येकांना ढोल हातात मिळाला नाही तर ते बैचेन होतात. सध्या अनेक जण ढोलताशा पथक काढत आहेत. काहिंना वादन म्हणजे काय? याचे पुरेस ज्ञान व माहिती नसते. मात्र प्रत्येक पथकामध्ये शास्त्रशुद्ध ज्ञान, शिस्त व नियम असणे गरजेचे आहे.
- रोहन धेंडवाल, संस्थापक, जगदंब ढोल-ताशा-ध्वज पथक, महाड

मागील तीन ते चार वर्षापासून ढोलताशा पथकात वादक अाहे. पारंपारीक वादनाबरोबरच येथून शिस्तबद्धता देखिल अंगी बाणावते. नियमित सराव करतो. गणपती सणासाठी तर जय्यत तयारी करतो.
- अनिकेत सुधाकर महाडिक, तरुण वादक, गोरेगाव

 

Web Title: Dhol-Tasha-flag squad ready for Ganapati ...