Pali News : तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला; दोन दिवसांनी मृत्यूदेह सापडला

सुधागड तालुक्यातील दिघेवाडी येथील तलावामध्ये सोमवारी (ता.25) सायंकाळी एक तरुण बुडाला. बुधवारी (ता.27) सकाळी या तरुणाचे शव सापडले.
Death News
Death Newsesakal

पाली - सुधागड तालुक्यातील दिघेवाडी येथील तलावामध्ये सोमवारी (ता.25) सायंकाळी एक तरुण बुडाला. बुधवारी (ता.27) सकाळी या तरुणाचे शव सापडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील आदिवासी वाडीवरील योगेश चिंतामणी पवार वय 25 हा आपल्या दोन मित्रांसह येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. यातील एक मित्र काठावर बसला होता. तर योगेश व त्याचा दुसरा मित्र तलावात पोहण्यासाठी गेला.

अर्ध्यातून दुसरा मित्र परत काठावर आला मात्र योगेश पुढे पोहत जात असतांना पाण्यात बुडाला. त्यानंतर याबाबत पाली पोलिसांना कळविण्यात आले. लागलीच पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व स्थानिक रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्र झाली असल्याने व पाण्यात जाण्यासाठी कोणतेही साधनसामग्री नसल्याने टीम मागे फिरली.

त्यानंतर तहसीलदार उत्तम कुंभार यांनी लागलीच खोपोली येथील गुरुनाथ साठेलकर यांच्या रेस्क्यू टीम सोबत संपर्क साधला. मंगळवारी (ता.26) या रेस्क्यू टीमने पाण्यात योगेशला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. अखेर बुधवारी (ता.27) योगेश पवारचे शव पाण्यावर तरंगताना आढळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com