
एखाद्या पत्राला प्राप्तकर्त्याचा अॅड्रेस न देता पाठवले तर ते योग्य व्यक्तीकडे कसे पोहोचेल? तुमची उपकरणे नेटवर्कवर संवाद साधताना याच गोष्टीवर अवलंबून असतात. यासाठी एमएसी अॅड्रेस म्हणजेच मीडिया अॅक्सेस कंट्रोल अॅड्रेसचा उपयोग होतो. जो प्रत्येक गॅजेटचा एक विशिष्ट ओळख क्रमांक असतो. मग तो तुमचा लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा स्मार्ट फ्रीज असो. एमएसी अॅड्रेस तांत्रिक वाटत असला तरी तो समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो तुमचे वायफाय संरक्षित करण्यास, तुमची गोपनीयता जपण्यास आणि हरवलेली उपकरणे शोधण्यात मदत करू शकतो. तो तुमच्या उपकरणांना सुरक्षित व कार्यक्षम ठेवण्याचे काम करतो. एमआयसी अॅड्रेस म्हणजे तुमच्या डिव्हाइसचे डिजिटल फिंगरप्रिंट्स म्हणण्यास हरकत नाही.
- प्रा. स. द. लाटकर, खेड, dlatkar@git-india.edu.in