उन्हेरे धरण बनले मद्दपींचा अड्डा, परिसरात अस्वच्छता

अमित गवळी
शनिवार, 7 जुलै 2018

पाली : सध्या अनेक ठिकाणची निसर्गरम्य धरणे व फेसाळणारे धबधबे हे पर्यटकांच्या मौजमजेची ठिकाणे झाली आहेत.मात्र काही ठिकाणी मद्दयपी पर्यटकांद्वारे परिसर अस्वच्छ केला जातो. सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणावर देखिल अशाच प्रकारे मद्यपींनी अस्वच्छता व प्रदुषण करुन ठेवले आहे.

निसर्गाने नटलेले उन्हेरे धरणावर सुट्टी वगळता फारसी पर्यटकांची गर्दी नसते. याच एकांतामुळे अनेक मद्दपींना येथे दारु पिण्याची नामी संधी उपलब्ध होते. मात्र हे तळीराम दारु रिचविल्यावर अापल्या सोबत अाणलेल्या बियर, दारुच्या बाटल्या, टिन तसेच वेफर्स अादींची प्लॅस्टिक अावरणे व प्लॅस्टिकचे ग्लास परिसरात तसेच टाकून जातात. त्यामुळे उन्हेरे धरण परिसर विद्रुप होऊन तेथे पर्यावरणीय प्रदुषण होत आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या लोकांचा त्रास इतर पर्यटकांना देखिल होण्याची शक्यता अाहे. याबाबत पोलिसांनी येथे गस्त घातल्यास मद्दयपींना अावर बसु शकतो.

''पर्यटक व निसर्गप्रेमींनी या ठिकाणी येऊन निसर्गाचा मनसोक्त अानंद लुटावा. मात्र मद्दयपींसाठी हि जागा नाही. प्रत्येकाने पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण केले पाहिजे. असे परिसर स्वच्छ ठेवणे अापलीच जबाबदारी आहे.''

अभिजीत देशमुख, पर्यटक

Web Title: Dirty Dam becomes the spot of drinkers