पाताळगंगा नदीवर पुलाची सोय नसल्याने गैरसोय

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

रसायनी (रायगड) - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच बाजुची गाव आणि वाड्यांतील नागरिकांना आपटा, गुळसुंन्दा तसेच आपटा आणि रसायनी रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाताना पाताळगंगा नदीवर पुलाची सोय नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने नागरिक नदी वरील बंधारा किंवा रेल्वे पुलावरून जिव धोक्यात घालुन जात आहे. जाताना अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहे. पाताळगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा आशी मागणी आहे. 

रसायनी (रायगड) - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच बाजुची गाव आणि वाड्यांतील नागरिकांना आपटा, गुळसुंन्दा तसेच आपटा आणि रसायनी रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाताना पाताळगंगा नदीवर पुलाची सोय नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने नागरिक नदी वरील बंधारा किंवा रेल्वे पुलावरून जिव धोक्यात घालुन जात आहे. जाताना अपघाताची भिती नागरिक व्यक्त करत आहे. पाताळगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा आशी मागणी आहे. 

परीसरातील चावणे, सवणे, जांभाविली, कालिवली, कासप, कराडे खुर्द, कराडे बुद्रुक आदी गाव आणि  जांभिवली, पेरूची,  तुळशीमळा, मोदीमळा, खुटलाची, गायचरणी आदि आदिवासी  वाड्यांतील ग्रामस्थांना आपटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बँकेत, तसेच आपटा आणि रसायनी  रेल्वे स्टेशन वरून पनवेल, रोहाकडे आणि पेण अलिबाग कडे एस टी बसने जाताना तसेच बाजुच्या गुळसुंन्दा आणि इतर गावात कामा निमित्त जाताना पाताळगंगा नदी ओलांडुन जावे लागत आहे. मात्र जाताना नदीवर पुल नाही. 

त्यामुळे पाताळगंगा नदी वरील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणा-या एमआयडीसीच्या पुला वरून बारा पंधरा किलोमीटर अंतराचा वळसा घालुन जावे लागत आहे. जाताना आर्थिक भुर्दड आणि वाया जाणारा वेळ त्यामुळे पदचारी आणि मोटर सायकलस्वार जिव धोक्यात घालुन चावणा बंधा-या वरून आणि इतर ठिकाणच्या रेल्वे पुला वरून पद्चारी जात असल्याने अपघाताची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान पाताळगंगा नदीवर पुल बांधावा आशी मागणी करण्यात आली आहे.  

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणा-या पुलापासुन ते खारपाडा येथील पुला पर्यंत या सुमारे तेरा किलोमीटर अंतरा मध्ये पुल नाही. त्यामुळे सारसईतील आदिवासी वाड्यांतील नागरिकांना आपटा येथे आणि कराडे खुर्द, व इतर गावांतील ग्रामस्थांना गुळसुंदे येथे पाताळगंगा नदी ओंलाडुन जाताना होडीची सोय आहे. तसेच चावणे, सवने, जांभिवली, कालिवली, पेरूची, तुळशीमळा, गायचरणी, मोदीमळा येथील ग्रामस्थांना पाताळगंगा नदी ओंलाडुन जाताना आपटा व कालिवली येथील रेल्वे किंवा चावणा बंधा-या वरून जिव धोक्यात घालुन जावे लागत आहे. असे सांगण्यात आले. 

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कराडे खुर्द, कराडे बुद्रुक, कासप, चावणे, जांभिवली कालिवली या गावांच्या हद्दित औद्योगिक विकास झापट्याने होत असल्याने लोकसंख्या वाढत आहे. तसेच अनेक गृहप्रकल्प बांधकाम व्यावसायिकांचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्या अजुन वाढणार आहे. लोकांची गैरसोय लक्षात घेऊन नदीवर पुल बांधला पाहिजे. असे रमेश पाटील चावणे यांनी सांगितले 

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कारखानदांरी वाढत आहे, तसेच परीसरातील गावांच्या हद्दित अनेक गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. वाढते दळवळण, नागरिकांची गैरसोय आणि मागणी लक्षात घेऊन भविष्यात नवीन पूल बांधण्याचे नियोजन आहे
एस एम कांबळे, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disadvantage due to lack of bridge over river Patalganga