नवेद नौकेचा शोध घ्या; अन्यथा समुद्रात चक्का जाम

जयगड येथील बेपत्ता मच्छीमारी नौकेचा शोध अजूनही सुरूच आहे
नवेद नौका
नवेद नौकाsakal media
Updated on

रत्नागिरी : जयगड येथील बेपत्ता मच्छीमारी नौकेचा शोध अजूनही सुरूच आहे. खासगी कंपनीच्या मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने नवेद २ नौका बुडाल्याचा मच्छीमारांचा अंदाज आहे. या प्रकरणी योग्य तो निर्णय झाला नाही तर समुद्रात चक्का जाम आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.

नवेद नौका
"मुझे कोई नाटक नही चाहिए.." NCBचे सिंग आणि सॅम्युअलचं संभाषण व्हायरल

या संदर्भात शुक्रवारी (ता. ५) साखरीआगार येथील एका मंदिरात बैठक झाली. गुहागर तालुक्यातील पालशेत, साखरीआगार, रत्नागिरी तालुक्यातील जयगड, वरवडेसह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे दोनशेहून अधिक मच्छीमार एकवटले होते. नवेद बोटीचे मालक नासीर हुसेनमियाँ संसारे यांच्यासह मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारीही उपस्थित होते. जयगडमधील नवेद २ मच्छीमारी नौकेचा अपघात मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने झाला असावा, असा संशय एका तक्रारीद्वारे बोटीचे मालक नासीर यांनी जयगड पोलिसांकडे व्यक्त केला आहे.

नवेद नौका
प्रकृती बिघडल्याने आसाराम एम्समध्ये; उपचार सुरु

पोलिसांचा तपास सुरू असला तरीही प्रशासनाकडून किंवा खासगी कंपनीकडून कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक आहेत. ती मच्छीमारी नौका कशी गायब झाली, याबाबत सखोल तपासाची मागणी होत आहे. त्यावर चार खलाशी आणि दोन तांडेल होते. एकाचा मृतदेह सापडला असून २२ वावात बेपत्ता नौकेवरील मच्छी साठवण्याचा टब मिळाला आहे. भविष्यात अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी गुहागर, जयगड येथील मच्छीमार मालवाहू नौका जाणाऱ्या चॅनेलवर मच्छीमारी नौका ठेवून समुद्रात चक्का जाम करण्याची तयारी केली आहे.

मालवाहू जहाजाचा तपास आवश्यक

या घटनेला आठ दिवसांहून अधिक काळ झाला आहे. बेपत्ता नौकेवरील खलाशांची माहितीही मिळत नाही. नवेद नौका बेपत्ता झाल्यानंतरच्या कालावधीत मालवाहू जहाज प्रवास करत असल्यास त्याचा तपास होणे आवश्यक आहे. या परिसरातून अनेक मच्छीमारी नौका फिरत असतात. मालवाहू नौका जा-ये करत असताना त्याची माहिती आजूबाजूच्या मच्छीमारांना वेळेत देणे आवश्यक असून त्याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, अशी मागणीही बैठकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com