दोन्हीही गटांतील परस्परविरोधी तक्रारी घेण्याचे काम उशिरा सुरू होते. जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अडखळ येथे शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दापोली : तालुक्यातील अडखळ तरीबंदर येथे दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड तणाव असून या भागाला पोलिस (Dapoli Police) छावणीचे स्वरूप आले आहे. ही घटना रात्री पावणेसातच्या सुमारास घडली. डंपर लावण्यावरून या वादाला ठिणगी पडली.