कुणबी समाजाच्या असंतोषाला वाचा फुटणार

The dissatisfaction of the Kunbi community will erupt
The dissatisfaction of the Kunbi community will erupt

मंडणगड - मंडणगड तालुक्‍यात प्रमुख राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्षांत झालेल्या बदलात, बहुसंख्येने असणारा कुणबी समाज अस्तित्वहीन व बेदखल होत असल्याची चर्चा आहे. समाजाचा निवडणुकीत उदो-उदो करून आपले इप्सित साधण्यासाठी राजकीय पक्ष समाजाचा वापर करतात. यावर सामाजाच्या बैठकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. ११ ऑक्‍टोबरला खेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीत समाजाच्या असंतोषाला वाट फुटण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यातील सामाजिक संघटनांतर्फे ‘कुणबी जोडो अभियान’ सुरू करण्यात आले आहे.

मंडणगड तालुक्‍यात ६५ ते ७० टक्के कुणबी समाज आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, मनसे अशा प्रमुख पक्षांत तालुक्‍याचे अध्यक्ष, प्रमुख नेतृत्व हे बहुतांशी वेळेला कुणबी समाजाकडे दिले जाते. 

राजकीय गणिते सोडविण्यासाठी वेळोवेळी त्याला गोंजारण्यात आले आहे; मात्र निवडणुका झाल्या की, पराभवाचे खापर फोडले जाते. वर्चस्व कमी करण्यासाठी पक्षांकडून पावले उचलण्यात येत असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. सरपंचपदाचा अपवाद वगळता पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा व संघटनेत महत्वाच्या पदांवर कुणबी नेतृत्वाला पोहचू दिले जात नाही.  

नुकतेच तालुक्‍यातील प्रमुख राजकीय पक्षांचे तालुका नेतृत्व अन्य समाजाकडे वळविण्यात आले. याबाबतची नाराजी लपून राहिलेली नाही. सत्तेपासून वंचित ठेवण्याऱ्या वरिष्ठ राजकीय नेतृत्वाविरोधात पडसाद उमटू लागले आहेत.याचा फटका स्थानिक निवडणुकांत बसण्याची दाट शक्‍यता आहे. 

राजकीय पक्षांत कुणबी समाजाबाबत वरिष्ठ पातळींवरील मानसिकता अशा पद्धतीने पुढे येत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. फक्त निवडणुकांसाठी वापर ही वैचारिक मानसिकता वेळीच बदलणे आवश्‍यक आहे अन्यथा त्याची झळ बसल्याशिवाय राहणार नाही.
- भाई पोस्टुरे, माजी सभापती व कुणबी नेते

घडामोडी पाहिल्यानंतर कुणबी समाजाची राजकीय क्षेत्रात मुस्कटदाबी असल्याचे स्पष्ट आहे. समाजातील व्यक्ती सक्षम असूनही अशा पक्षीय कृतीमुळे सामाजिक क्षेत्रात प्रचंड नाराजी पसरली. त्याचा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे.
- संतोष गोवळे, जिल्हा परिषद सदस्य व कुणबी नेते

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com