"दिव्यांग" वेबसिरीज : कोकणात सिनेसृष्टीच्या दिशेने पाऊल पुढे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

अनेक गूढ रहस्यांनी भरलेली, चकित करणाऱ्या प्रसंगासोबत प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ही एक थ्रिलर सस्पेन्स कथा आहे. दिव्यांग ही नवी कलाकृती नेटफ्लिक्‍स, एस. एक्‍स. प्लेअर यासारख्या कमर्शियल ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे.

रत्नागिरी - "कोकणातल्या झाकन्या" या वेबमालिकेतून जगभर पोचलेले व "ती आमच्या गावाची" मागच्या बेंचवर या वेब मालिकेतून वेगळ्या विषयावर भाष्य करणारे के. झेड प्रॉडक्‍शन व्यावसायिक कलाकृतीच्या निर्मितीकडे वळले आहे. कोकणात स्थानिक कलाकार मिळून कोकणातच सिनेसृष्टी निर्माण करण्याचा मानस असलेल्या या कलाकार मंडळींनी या निमित्तानं एक पाऊल पुढे टाकताना "दिव्यांग" या नव्या कलाकृतीचे चित्रीकरण तालुक्‍यात विविध गावात होणार आहे. 

अनेक गूढ रहस्यांनी भरलेली, चकित करणाऱ्या प्रसंगासोबत प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ही एक थ्रिलर सस्पेन्स कथा आहे. दिव्यांग ही नवी कलाकृती नेटफ्लिक्‍स, एस. एक्‍स. प्लेअर यासारख्या कमर्शियल ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे. रत्नागिरी, जाकादेवी, चवे, आगरनरळ या भागात या वेब मालिकेचे चित्रीकरण होणार आहे. दिव्यांगची पटकथा व दिग्दर्शन प्रदीप शिवगण यांची आहे. सागर कावतकर, किशोर कनोजिया सहाय्य करत आहेत. सचिन सावंत व शुभम वाडकर हे यांचे छायादिग्दर्शक आहेत. तर स्वप्नील जाधव, श्रेया जाधव, दीप्ती वहाळकर, सचिन गावणकर हे प्रॉडक्‍शनचे काम पाहत आहेत. 

स्थानिक कलाकारांसाठी संधी 
स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात काम मिळावे, उत्पन्न मिळावं यासाठीच दिव्यांग हे पहिले पाऊल आहे. व्यावसायिक ओटीटीसाठी तयार होणारी ही कोकणातील पहिली वेबसिरीज ठरेल. चित्रीकरणासाठी आधुनिक तंत्र वापरत आहोत. इथेच सिने-नाट्य इंडस्ट्री उभी राहावी, या दिशेने पाऊल असल्याचे शिवगण म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang Webseries A Step Towards Cinema In Konkan