
Kokan Railway : कोकण रेल्वेच्या दिवाळी विशेष गाड्या
रत्नागिरीः कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी विशेष गाड्या धावणार आहेत. दिवाळी दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने आरक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक (टी) ते थिविम आणि पनवेल ते थिविम या स्थानकादरम्यान या गाड्या धावणार आहेत.
गाडी क्र. ०१२५७ ही गाडी लोकमान्य टिळक येथून बुधवार ३ नोव्हेंबरपासून पहाटे ५.३३ वाजता सुटेल. ही गाडी थिविम येथे त्याच दिवशी सायंकाळी ४.५० वाजता पोहोचेल. परतीसाठी गाडी क्र. ०१०५८ थिविम येथून गुरुवार ४ नोव्हेंबरपासुन सायंकाळी ५.३० वाजता सुटेल. लोकमान्य टिळक स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबेल. गाडी क्र. ०१२५९ पनवेल येथून गुरुवार ४ नोव्हेंबरपासून सकाळी ६.१५ वाजता सुटेल.
त्याच दिवशी सांयाकळी ४.५० वाजता थिविमला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्र. ०१२६० बुधवार ३ नोव्हेंबरला थिविम येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३२ वाजता पनवेलला पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबेल.
Web Title: Diwali Festival Special Train Lokmanya Tilak To Thivim And Panvel To Thivim Station
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..