esakal | "हेलियम' चा शोध कोठे लागला माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Do You Know Where Helium Was Discovered Ratnagiri Marathi News

हेलिमय या मूलद्रव्याचा शोध लागल्याने मंगळवारचा दिवस जगभरात हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. यासंदर्भात ऍड. पाटणे म्हणाले, शिलाहार घराण्यातील राजा भोज याने विजयदुर्ग किल्ला बांधला.

"हेलियम' चा शोध कोठे लागला माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - हेलियमचा पाळणा किल्ले विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे 18 ऑगस्ट 1868 रोजी सूर्यग्रहणाच्या वेळी हलला. याला मंगळवारी (ता. 18) 152 वर्षे होत आहे. हा वैज्ञानिक वारसा आपण कोकणवासियांनी जतन केला पाहिजे. त्यासाठी तारांगण किंवा शालेय अभ्यासक्रमात याचा धडा घ्यावा. तसेच विजयदुर्गाच्या पडझडीकडे शासनाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन येथील विधीज्ञ विलास पाटणे यांनी केले. 

हेलिमय या मूलद्रव्याचा शोध लागल्याने मंगळवारचा दिवस जगभरात हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. यासंदर्भात ऍड. पाटणे म्हणाले, शिलाहार घराण्यातील राजा भोज याने विजयदुर्ग किल्ला बांधला. हा किल्ला शिवशाहीत बलाढ्य आरमार तळ म्हणून प्रसिद्ध होता. विजयदुर्ग किल्ल्यावर परदेशी खगोलतज्ज्ञांनी त्यावेळी रोखलेल्या दुर्बिणींसाठी तयार करण्यात आलेली जागा "सायबाचा कट्टा' म्हणून प्रचलित आहे. येथे खग्रास सूर्यग्रहणाने जगाला एक दिशा देणारा शोध लावला गेला.

18 ऑगस्टला सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याची जवळून छाया टिपण्यासाठी विजयदुर्ग किल्ल्यावर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनचे सर नॉर्मल लॉकियर, फ्रान्सचे जेन्सन यांनी विजयदुर्गवरून दुर्बिण लावण्यासाठी विशिष्ट कोनामध्ये चौथरा बांधून घेतला. आता वेध होता, तो ग्रहणाचा. सूर्यग्रहणाचा वेध घेण्यासाठी दुर्बिणीवर स्पेक्‍ट्रॉमीटर बसविण्यात आला. पिवळी रेषा म्हणजे हेलियम आहे, याचा शोध लागला.

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रयत्नाने हेलियम डे किल्ल्यावर दरवर्षी विज्ञानप्रेमी मंडळी साजरा करतात, अशी माहिती ऍड. पाटणे यांनी दिली. 

शोधाचा साक्षीदार "सायबाचा कट्टा' 
हेलियम मूलद्रव्याचा शोध लागल्यानंतर मनुष्य जीवनात मोठी क्रांती झाली. वैद्यकीय क्षेत्रात हेलियमचा वापर वाढला आहे. मात्र, या शोधाची जननी म्हणून विजयदुर्गचे नाव नोंदले गेले. या हेलियमच्या शोधाचा साक्षीदार "सायबाचा कट्टा' आज खगोलशास्त्रज्ञांना प्रेरणा देत विजयदुर्गच्या भूमीवर उभा आहे.