अपघातात अडीच वर्षांचं बाळ गाडीबाहेर फेकलं गेलं अन् हृदयाचे ठोकेच बंद पडले, डॉक्टरांनी वेळीच..

गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी अडीच वर्षांचे बाळ गाडीबाहेर फेकले गेले.
Mumbai-Goa National Highway Accident
Mumbai-Goa National Highway Accidentesakal
Summary

या बाळाच्या हृदयाचे ठोके (Heartbeat) पूर्ण बंद झाले होते. या मार्गावरून निघालेले डॉ. अमोल पवार यांनी बाळाकडे धाव घेत प्रसंगावधान राखत त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर (Mumbai-Goa National Highway) तुरळ-हरेकरवाडी येथे बुधवारी (ता. ३) बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील अडीच वर्षांचे बाळ गाडीबाहेर फेकले गेले. तेथील रस्त्यावरील एका चालकाने या बाळाला पाहिले आणि त्याला उचलून घेतले. याच मार्गावरून आपल्या चिपळूणच्या ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे डॉ. अमोल पवार प्रवास करीत होते.

या बाळाला पाहताच डॉ. पवार यांनी प्रसंगावधान राखत सीपीआर (CPR) देण्यास सुरुवात केली. बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. मात्र, सीपीआरला बाळाने प्रतिसाद दिला आणि हालचाल करण्यास सुरुवात केली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली होती. त्यावेळी चालकास किरकोळ दुखापत झाली; पण गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी अडीच वर्षांचे बाळ गाडीबाहेर फेकले गेले.

Mumbai-Goa National Highway Accident
गुप्तधनासाठी घरात खड्डा खोदला, मांत्रिकाला बोलवलं अन् नरबळी..? कौलवमधील थरारक प्रकाराने पंचक्रोशी हादरली

या बाळाच्या हृदयाचे ठोके (Heartbeat) पूर्ण बंद झाले होते. या मार्गावरून निघालेले डॉ. अमोल पवार यांनी बाळाकडे धाव घेत प्रसंगावधान राखत त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांतच बाळाने सीपीआर प्रक्रियेला प्रतिसाद दिला. त्यामुळे डॉ. पवार यांनी त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. आपल्या गाडीतून त्यांनी बाळ व त्याच्या कुटुंबीयांना १५ किमी अंतरावरील संगमेश्‍‍वर येथील रुग्णालयात नेले. या प्रवासादरम्यानही बाळाला सीपीआर देण्यात आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच बाळ स्थिरावले व त्याचा श्वासोच्छवास पूर्ववत झाला होता.

Mumbai-Goa National Highway Accident
पालकांचा मुलांच्या मित्रांसोबत व्यवहार कसा असावा? वाढत्या वयातील 'मैत्री' कशी जपली पाहिजे? जाणून घ्या..

कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन असा सीपीआरचा लाँगफॉर्म आहे. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते. सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ज्याचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास किंवा हृदयाचे ठोके बंद झाले असतील, तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात. या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्यूदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो.

-डॉ. अमोल पवार, ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com