esakal | मस्तच ! मिऱ्या ते नेवरे किनारी डॉल्फिन 
sakal

बोलून बातमी शोधा

Dolphin See Between Mirya To Nevare Sea Shower

समुद्रकिनाऱ्यावर असलेली सजीवसृष्टी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होतात. त्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो. गुहागर, हर्णै, मुरुड, कर्दे, दापोलीसह रत्नागिरी तालुक्‍यातील मिऱ्या, काळबादेवी, आरे-वारे जवळ डॉल्फिन माशांची झुंडच्या झुंड पाहायला मिळते.

मस्तच ! मिऱ्या ते नेवरे किनारी डॉल्फिन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असून याच कालावधीत मिऱ्या, नेवरे, काजिरभाटी, काळबादेवी किनारी डॉल्फिनचा वावर सुरू झाला आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर डॉल्फिनच्या झुंडी पाहायला मिळत आहेत. पर्यटकांसाठी पर्वणी असून किनाऱ्यावर उभे राहून त्यांना न्याहाळण्याचा आनंद वेगळाच असतो. 

समुद्रकिनाऱ्यावर असलेली सजीवसृष्टी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होतात. त्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो. गुहागर, हर्णै, मुरुड, कर्दे, दापोलीसह रत्नागिरी तालुक्‍यातील मिऱ्या, काळबादेवी, आरे-वारे जवळ डॉल्फिन माशांची झुंडच्या झुंड पाहायला मिळते. पारा घसरू लागल्यानंतर जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरवात झाली.

या कालावधीत डॉल्फिन कोकणातील किनाऱ्यांवर पाहायला मिळतात. हा मासा शांत असून पाण्यातून पोहत जाताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. त्याचा कोणताही त्रास पर्यटकांना होत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक किनाऱ्यावर सकाळच्या सत्रात गर्दी करतात. उष्मा वाढला की मासे खोल पाण्याकडे वळतात. अनेक होडीवाले हे मासे पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन समुद्रात जातात. त्यावर पर्यटन व्यवसायही चालतो. 

मच्छीमारांना त्रासदायक 
मच्छीमारांच्या जाळ्यात डॉल्फिन मासे आले तर ते जाळे फाडून टाकतात. त्यामुळे मोठे नुकसानही होते. हा सर्वाधिक त्रास गिलनेटधारकांना सहन करावा लागतो. अनेकवेळा जाळ्यात सापडलेली मासळीही ते मासे खाऊन टाकतात. 

थंडी सुरू झाली की डॉल्फिन मासा मोठ्या प्रमाणात मिऱ्यासह जवळच्या परिसरात दिसू लागतो. यंदा त्याचे प्रमाण कमी आहे; मात्र हळूहळू त्याचे प्रमाण वाढले. 
- श्रीदत्त भुते, मच्छीमार