ग्रामपंचायतीतील वर्चस्व अबाधित ठेवणार का ? पुढाऱ्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी

dominated on gram panchayat stability possible or not in mandangad ratnagiri
dominated on gram panchayat stability possible or not in mandangad ratnagiri

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्‍यात पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने महत्त्‍वपूर्ण असलेल्या उमरोली, भोळवली, म्हाप्रळ, पालघर, घोसाळे, पाट, पालवणी, वेळास, जावळे या ग्रामपंचायतीचे निवडणुकीत विद्यमान पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह राजकीय पक्षांचे तालुक्‍याचे नेतृत्वाची प्रतिष्ठा पणास लागली आहे. या निवडणुकीतील विजय हे त्याचे राजकीय महत्त्‍व अधोरेखित करणारे असल्याने ग्रामपंचायतीवरील वर्चस्वासाठी मोर्चेबांधणीस वेग आला आहे.

गरजेनुसार महाविकास आघाडी वा गाव पॅनेलच्या संकल्पनेचा आधार घेण्यात आल्याचे स्पष्ट होते. ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचा झेंडा कायम राहावा, यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. उमरोली ग्रामपंचायतीत मनसे तालुकाध्यक्ष महेश कंचावडे, वसंत अबगुल स्वतः निवडणूक रिंगणात आहेत. वेळासमधून राष्ट्रावादी काँग्रेसच्या सेवा दलाचे नेते हेमंत सालदुरकर रिंगणात आहेत.

जावळे ग्रामपंचायतीत शंकर खेराडे, महेश भानसे, महेंद्र रटाटे, प्रमोद भानसे ही नावाभोवती मोठे वलय असणारी मंडळी निवडणूक रिंगणात उतरली आहेत. या गणाचे पंचायत समिती सदस्य आदेश केणे, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, माजी जिल्हा परिषद प्रकाश शिगवण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अनिल रटाटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देव्हारे गणाच्या सदस्या व सभापती स्नेहल सकपाळ यांच्या पालवणी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

४९ सदस्य बिनविरोध

तालुक्‍यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पाट ग्रामपंचायतीमधील २ जागा रिक्त राहणार आहेत.

शिरगाव ग्रा. पं. निवडणुकीत..

माजी सभापती राजकुमार निगडुकर, शिवसेनेचे इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, रिपाईंचे माजी तालुकाध्यक्ष राजेश गमरे.

कादवण व भोळवलीत लढतीही लक्षवेधी 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुलतान मुकादम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांच्या पालघर ग्रामपंचायतीत विरोधकांनी त्यांना आव्हान दिले असून त्यांच्या प्रभागातील कादवण व भोळवली येथील लढतीही लक्षवेधी ठरणार आहेत.
याची पाट व म्हाप्रळ ग्रा.पं.मध्ये प्रतिष्ठा पणाला

  • पाट ग्रामपंचायतीत पंचायत समिती सदस्या प्रणाली चिले, संदेश चिले 
  • म्हाप्रळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझ्झफर मुकादम

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com