"सध्या बौद्धांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लेण्यांवर अतिक्रमण केले जात आहे. दीक्षा भूमीचे विदृपीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला."
रत्नागिरी : ‘एक समाज दुसऱ्या समाजाचा द्वेष करू लागला आहे. देशातील विषमतावादी व्यवस्था ही समाजासाठी अत्यंत घातक अशी आहे. अशावेळी समाजात एकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बौद्धधम्माचा (Buddhism) विचार सर्वांना समावून घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Bhimrao Ambedkar) यांनी केले.