esakal | डॉ. धनंजय चाकूरकरांची अखेर बदली 
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Dhananjay Chakurkar was finally replaced

राज्य शासनाने काल सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यात डॉ. चाकुरकरांचा समावेश आहे.

डॉ. धनंजय चाकूरकरांची अखेर बदली 

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची शासनाने नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने काल (ता.1) रात्री उशिरा आदेश काढले आहेत. 

राज्य शासनाने काल सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यात डॉ. चाकुरकरांचा समावेश आहे. यात डॉ. चाकुरकर यांची सहाय्यक संचालक वैद्यकीय सेवा (मुंबई) मंडळ ठाणे येथे रिक्त जागी बदली करण्यात आली. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांची सिंधुदुर्ग सामान्य रुग्णालय येथे शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. चव्हाण यांनी केलेल्या विनंतीनुसार ही नियुक्ती देण्यात आली. 

शल्य चिकित्सक म्हणून डॉ. चाकुरकरांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कोरोना काळात सुरुवातीला त्यांनी समन्वय राखून काम केले; परंतु नंतरच्या काळात त्यांची मनमानी सुरू झाल्याचा आरोप होता. कोरोनाची वस्तुस्थिती लपविणे. त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. वेळेत ठेकेदार नियुक्त न करणे. सहकारी अधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेणे असे आरोप झाले. त्यांच्या काळात मनसेने केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. त्यांच्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांतही तीव्र नाराजी होती. 

पदभार स्वीकारण्याचे आदेश 
शासनाने बदलीचे आदेश काढताना बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ पदभार स्वीकारावा. सुटी घेतल्यास किंवा दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. वरिष्ठांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास किंवा सुटी दिल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top