नालेसफाईचे फक्त सोपस्कार

नालेसफाईचे फक्त सोपस्कार

-rat९p३२.jpg -
२४M८९०४७
खेड ः पालिका हद्दीतील गटारे तुंबलेली आहेत.
--------------
खेडमध्ये नालेसफाईचे फक्त सोपस्कार

गटारात कचरा, प्लॅस्टिक बाटल्यांचे खच; परिसरात दुर्गंधी

सकाळ वृत्तसेवा

खेड, ता. १० : नगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच मान्सूनपूर्व कामे हाती घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत गटरांची स्वच्छता केली. मात्र, नालेसफाईनंतरही गटारे कचऱ्याने तुंबलेलीच असल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केवळ नालेसफाईचे सोपस्कार पार पाडले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपलेला असताना अजूनही नगर प्रशासनाने परिपूर्ण नालेसफाई न केल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

येथील नगर पालिकेने पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता केली; मात्र, सद्यःस्थितीत गटरांमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्ससह कचऱ्याचा खच निदर्शनास येत असून पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसल्याने गटारे तुंबली आहेत याशिवाय बऱ्याच ठिकाणी सांडपाणीदेखील रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पोलिस ठाणे परिसरातील गटारांचीही हीच अवस्था असून, तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यात दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. तुंबलेल्या गटारांची परिपूर्ण स्वच्छता करण्यासाठी नगर प्रशासनाला सवड मिळणार तरी कधी? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील तळ्याचे वाकण येथील गटार पूर्णपणे तुंबले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय महाडनाका परिसरातदेखील हीच परिस्थिती कायम आहे. प्रशासनाने याकडे वेळेच लक्ष न दिल्यास नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com