esakal | वेंगुर्लेत दारू न मिळाल्याने त्याने उचलले हे पाऊल...

बोलून बातमी शोधा

drinker people suicide in vegurla kokan marathi news

 आत्माराम शनिवारी रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला होता. चार दिवस दारू न मिळाल्याने आत्माराम ची मानसिक स्थिती बिघडली होती.

वेंगुर्लेत दारू न मिळाल्याने त्याने उचलले हे पाऊल...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) :दारू प्यायला न मिळाल्यामुळे मानसिक दृष्ट्या सैरभैर होऊन आरवली- सोन्सुरे येथील आत्माराम पुरुषोत्तम गडेकर (३५) या तरुणाने शनिवारी मध्यरात्री स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला.

हेही वाचा- पोलिसांचा मदतीचा हात ;अन् ती गरोदर महिला पोहचली दवाखान्यात...
   आत्माराम शनिवारी रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला होता. त्याला दारूचे व्यसन होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे दारूची दुकाने सर्वत्र बंद आहेत. या दरम्यान चार दिवस दारू न मिळाल्याने आत्माराम ची मानसिक स्थिती बिघडली होती.

हेही वाचा- बातमीचा परीणाम ; संगमेश्वरातील अखेर ती कंपनी आजपासुन बंद...

दारू न मिळाल्याने घरात वस्तूंची आधळ आपट करणे, घरातून आतबाहेर करणे असे त्यांचे प्रकार सुरू होते. या स्थितीत त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत घरातली जेवण बनवण्याच्या खोलीत आढळून आला. आत्माराम हा अविवाहित होता. तसेच तो पट्टीचा वाहन चालकही होता. त्याच्या पाश्चात आई, दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे.