अमली पदार्थ प्रकरण : कारवाई टाळण्यासाठीच संशयित आले रत्नागिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drug case suspect came to Ratnagiri avoid action police custody for 7 days

अमली पदार्थ प्रकरण : कारवाई टाळण्यासाठीच संशयित आले रत्नागिरीत

रत्नागिरी : उच्च प्रतिचा मेथ्यॅक्युलॉन (एमडी) अमली पदार्थ सापडलेले ते दोन्ही केरळीन आपली गाडी मंगळुरू येथे तपासली जाणार, या भीतीने रत्नागिरीत उतरल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे रत्नागिरीशी याचे काही कनेक्शन नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, संशयितांपैकी यातील एक सराईत असून यापूर्वीही त्याने अमली पदार्थांची राजरोस वाहतूक केल्याचा संशय आहे.

सियाद एके (वय २५), नजफ मैदू नौफल (वय २३, दोन्ही रा. केरळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही या संशयितांची नावे आहेत. रविवारी कोकण रेल्वेने दिल्लीहून ते केरळला निघाले होते. त्याच्या ताब्यात सुमारे पाच लाखचे एमडी अमली पदार्थ होता. केरळला जाताना आपली गाडी मंगळुरूला तपासली जाण्याची शंका त्यापैकी एकाला होती. त्यामुळे त्याने सहकाऱ्याला सांगून रत्नागिरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. ते रत्नागिरीत कॉंग्रेसभुवन येथील एका लॉजवर उतरले. दुसऱ्या दिवशी पहाटे ते रहाटघर येथे संशयास्पदरित्या फिरताना दिसले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

अमली पदार्थांचे रत्नागिरी कनेक्शन?

मंगळुरू येथील तपासणी चुकविण्यासाठी संशयित रत्नागिरीत उतरले. अंमली पदार्थांचे रत्नागिरी कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात प्राथमिकदृष्ट्या रत्नागिरीशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले, दरम्यान संशयितांना सात दिवसांची कोठडी मिळाली.

Web Title: Drug Case Suspect Came To Ratnagiri Avoid Action Police Custody For 7 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top