

Monsoon Preparation: Dry Fish Markets Bustle in Raigad Ahead of Fishing Ban
Sakal
पाली : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 1 जून पासून दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते. पावसाळ्यातील बेगमीसाठी सुकी मासळी हक्काची जिन्नस आहे. आणि मग यावेळी मांसाहारी खाणा-यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. शिवाय भाव देखील स्थिर आहेत. परिणामी खवय्ये सुकी मासळी खरेदीची घाई करत आहेत.