अवकाळी पावसाने वीटभट्टी चालक व आंबा बागायतदार धास्तावले

अमित गवळे
सोमवार, 15 एप्रिल 2019

पाली - जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी (ता.१४) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विटभट्टी चालक व आंबा बागायतदार धास्तावले आहे. त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा जर पावसाने हजेरी लावली तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र पावसाच्य शिडकाव अाणि वारा यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तर मातीच्या सुगंधामुळे वातावरण अल्हाददायक झाले होते.

अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत होता. वादळी वारा देखील वाहत होता. पालीत रात्री विज पुरवठा वारंवार खंडित होत होता. विटभट्टी व्यवसाईकांना काही प्रमाणात आर्थिक फाटका बसला आहे. विटभट्टीला लागणारा कच्चा माल काही प्रमाणात पावसात भिजला आहे. तसेच जिल्ह्यात आधीच आंब्याचे उत्पादन कमी आले आहे. त्यात वारा व पावसाने काही ठिकाणी आलेल्या कै-या खाली पडून नुकसान झाले. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाने जर जोरदार हजेरी लावल्यास आपले नुकसान होणार या भितीने विट भट्टी मालक व आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

अवकाळी पावसाने थोडे नुकसान झाले. जर आणखी मोठा पाऊस आला तर कच्चा माल पुर्णपणे खराब होण्याची भिती आहे. मात्र आता खबरदारी घेत आहोत.
- रौफ बेणसेकर, विटभट्टी मालक, पाली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the sudden rain the vatbhati and mango growers are in pronlem

टॅग्स